आरोग्य व शिक्षण

बीडकरांनो खबरदार: कोरोना रुग्ण संख्या पोहोचली 200 पार

बीड — जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
‌ जिल्ह्यात सोमवारी 3579 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज प्राप्त झाले, त्यामध्ये 211 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर 3368 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 36, अंबाजोगाई 10, आष्टी 43, धारूर 5, गेवराई 14, केज 10, माजलगाव 5, परळी 1, पाटोदा 28, शिरूर 42, वडवणी 17 असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाचा आकडा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने तीन तालुक्यांमध्ये आणखी निर्बंध कडक केलेले आहेत. येणाऱ्या काळात नियमांचे पालन केले गेले नाही तर हा आकडा आणखी वाढण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close