आपला जिल्हा

माकड रिक्षा समोर आल्याने रिक्षा पलटला एक महिला ठार

माजलगाव —तालुक्यातील लोणगाव येथे अचानक रिक्षासमोर माकड आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले यामध्ये रिक्षा पलटी झाला.या अपघातात गजराबाई हारीभाऊ हजारे ( ६०) यांचा जागीच मृत्यु झाला.सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सध्या खरीप हंगाम सुरू असून मजूर टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे दुसरीकडच्या मजूरांना आणण्यासाठी वाहनांची सोय शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
लोणगाव येथे सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास याच गावातील ऑटो रिक्षा लोणगाव – जीवनापूर रस्त्यावरून काही महिलांना घेऊन जात होता. यावेळी अचानक समोर माकड आल्याने चालकाचा रिक्षावरील ताबा सुटला. यामुळे रिक्षा उलटला आणि बाजूच्या खड्ड्यात पडला.यावेळी रिक्षातील गजराबाई हजारे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जागीच मरण पावल्या. तर नंदिनी अशोक हजारे वय 14 वर्ष या मुलीच्या दोन्ही पायाला मार लागला आहे. तिच्यावर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच अन्य २-३ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर लोणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close