क्राईम

अबब..! अवैध वाळुने भरलेले 17 हायवा पकडले ;तहसीलदार खाडे यांनी केली कारवाई

5 कोटींचा मुद्देमाल जप्त ; वाळू माफियात खळबळ, गोदावरी पात्रात वाळू चोरांची पळापळ

गेवराई —— गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा सुरुच असून, हायवाद्वारे वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही नियम धाब्यावर बसवून काही वाळू माफिया रात्री – अपरात्री वाळुची वाहतूक करत आहे. दरम्यान ,राक्षसभुवन शिवारातून मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना मिळाल्यावर, त्यांनी
दि.19 रोजी पहाटे महसूल विभागाने छापा मारून वाळुने भरलेले 17 हायवा पकडले. या कारवाईमुळे वाळू माफियात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळुचा उपसा सुरुच आहे. वाळु माफियांविरोधात कठोर कारवाई केली जात नसल्यामुळे वाळुचा उपसा होत आहे. राक्षसभुवन शिवारातून रात्रीच्या दरम्यान वाळुचा उपसा होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना झाल्यानंतर त्यांनी आज पहाटे घटनास्थळी छापा टाकला. या वेळी 17 हायवा घटनास्थळी आढळून आले. तहसीलदारांनी छापा टाकल्यानंतर नदीपात्रात एकच खळबळ उडाली. काही हायवा चालकांनी गाड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र पाऊस पडल्याने सर्वत्र चिखल झालेला आहे. चिखलात काही गाड्या फसल्या होत्या. या कारवाईत एकूण 17 गाड्या महसूल विभागाला सापडल्या. यात काही ब्रास वाळुही होती. अंदाजे एकूण 5 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार सचीन खाडे, पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे, युवराज टाकसाळ, मंडळ अकिारी पखाले, लेंडाळ, अंगद काशीद, कुरळकर, कुलकर्णी मॅडम, शेख जावेद, तलाठी पांढरे, डोपे, देशमुख, सुरावार, सुपेकर, ढाकणे, कोतवाल काळे, बेलुर, गिरी, चव्हाण यांनी केली. दरम्यान या सर्व हायवा गेवराई बस डेपोच्या आवारात लावण्यात आल्या असून पुढील कारवाई सुरू होती. यातील काही गाड्या नगरच्या तर काही गाड्या बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते. या कारवाईमुळे वाळू माफियात एकच खळबळ उडाली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close