ब्रेकिंग

प्रशिक्षण अकादमीचे हेलिकॉप्टर चोपडा तालुक्यात दूर्घटनाग्रस्त,पायलटचा मृत्यू

चोपडा — जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या वर्डी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर प्रशिक्षण अकादमीचे होते आणि त्यात एका महिला पायलटसह दोन पायलट होते. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाले ज्यामध्ये एका पायलटला आपला प्राण गमवावा लागला.अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमी महिला पायलटला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. वर्डी गावचा परिसर डोंगरांनी वेढला गेलेला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close