आपला जिल्हा

शिंदेवस्तीकर (गारमाळ) 15 ऑगस्टला रामेश्वर साठवण तलावात आंदोलन करणार

पाटोदा — तालुक्यातील शिंदेवस्ति (गारमाळ) ग्रामस्थांनी वारंवार निवेदन प्रशासनाला देऊन फारसा फायदा न झाल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी रामेश्वर साठवण तलावात धरणात उतरून आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी बीड ,उपविभागीय आधिकारी पाटोदा, तहसिलदार आष्टी, तहसिलदार

पाटोदा, लघुपाटबंधारे विभाग आष्टी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिला आहे.

   पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्ति (गारमाळ)या अंदाजे 500 लोकसंख्या असलेल्या वस्तीला विचरणा नदीवरील रामेश्वर साठवण तलावातील पाण्यामुळे 20 वर्षापासुन अगोदरची 5-6 वर्ष ट्रकच्या ट्युबमध्ये हवा भरून त्यावरून तर त्यानंतरची 15 वर्षे थर्मोकोलवरून चप्पद्वारे वाहतुक करावी लागत असे, गेल्या 6 -7 महिन्यापासुन मुंबईतील बांद्रेवाडीकर गणेशोत्सव मित्रमंडळाने दिलेल्या तराफ्यावरून वाहतुक करत आहेत. शिंदेवस्तिवर 4 थी पर्यंत जिल्हापरिषद प्राथमिक शाळा असुन नंतर सौताड्याला तलावातुन प्रवास करूनच जावे लागते, भाजीपाला, दुधदुभते, किराणा, दवाखाना सर्वगोष्टींसाठी तलावातील पाण्यातुन जिवघेणा प्रवास करूनच जावे लागते.

15 ऑगस्टला रामेश्वर साठवण तलावात आक्रोश आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
गेल्या वर्षभरापासून वारंवार जिल्हाधिकारी, उपविभागीय आधिकारी कार्यालय पाटोदा, तहसिल कार्यालय पाटोदा याठिकाणी निवेदन, आंदोलन केल्यानंतर तसेच 2 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे धरणे आंदोलन करून सुनिल केंद्रेकर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्यानंतर आढावा बैठकीत विचारविनिमय करून प्राधान्याने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, त्याला 8 महिने होत असून प्रश्न न मार्गी लागल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रामेश्वर साठवण तलावात उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याबद्दल लेखी निवेदन दिले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close