आरोग्य व शिक्षण

आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेशासाठी मुदतवाढ ;२३ जुलै पर्यंत घेता येणार प्रवेश

जिल्ह्यात १ हजार ३६ विद्यार्थ्याना मिळाला मोफत प्रवेश

शिरूर, बीड तालुके प्रवेश देण्यास आघाडीवर तर धारुर, आंबेजोगाई , माजलगाव तालुक्यांचा प्रवेश देण्यास नकार.

बीड —– बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , २००९ नुसार सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत २५ टक्के प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे प्रवेश पालकांनी शाळेत जावून घेण्याची मुदत दिनांक ०९ जुलै पर्यंत होती . परंतू गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांच्या स्तरावरुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित झाले नसल्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरीता आणि गटशिक्षणाधिकारी यांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्याकरीता दि. २३ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ मध्ये जिल्ह्यात खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांमधील आरटीई अंतर्गत मोफत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी बीड जिल्ह्यात २३३ पात्र शाळांमधे ३ हजार ९३८ इतके ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या अर्जांची लॉटरी पद्धतीने सोडत दी. ७ एप्रिल रोजी करण्यात आली. यात १५ एप्रिल रोजी जिल्ह्यातील २ हजार १२ विद्यार्थ्याची निवड मोफत प्रवेशासाठी करण्यात आली होती. या पैकी १ हजार ३६ विद्यार्थ्याना प्रत्येक्षात प्रवेश मिळाले आहेत तर आणखी ९७५ प्रवेश होणे बाकी आहे. यात शिक्षण हक्क कायद्याचे पालन करत शिरूर तालुका प्रवेश देण्यात अव्वल स्थानी आहे तर बीड शहर आणि तालुका हा दुसऱ्या स्थानी आहे. धारुर तालुक्यात एकही प्रवेश देण्यात आला नाही तर माजलगाव आणि आंबेजोगाई हे तालुके प्रवेश देण्यास पिछाडीवर आहेत. अशी माहिती मनोज जाधव यांनी दिली आहे.

तालुके – आरटीई पत्र- निवड झालेले- मिळालेले
शाळांची संख्या.  विद्यार्थी.  प्रवेश
अंबाजोगाई —     37. 301. 55
आष्टी —            14. 31. 14
बीड.   —-.      18. 161. 121
धारूर    —-      08. 100. 00
गेवराई.  —-     36. 346. 218
कैज.    —–     21. 176. 120
माजलगाव   — 29. 193. 33
परळी.    —-     29. 309 192
पाटोदा.—-.      04. 20. 14
शिरूर  —-       10. 61. 51
बीड शहर  —-.   20. 256. 184
वडवणी. —– . 07. 58. 34
एकूण. —–   233. 2012. 1036

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close