महाराष्ट्र

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला टेम्पोची धडक

हिंगोली — येथील शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन करून येत असतांना राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. वर्षा गायकवाड या सुखरूप आहेत. तसेच वर्षा गायकवाड यांचा वाहन चालकही सुखरूप आहे.

राज्य शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दोन दिवसापासून हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप टेम्पोची धडक बसल्याची घटना शहरातील पिपल्स बँकेजवळ आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, यात वर्षा गायकवाड यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.
आज सकाळी अकरा वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. ताफा पिपल्स बँकेजवळ आला असता याच वेळी मोंढ्यातून भरधाव वेगाने एक पिकअप टेम्पो मुख्य रस्त्यावर येत होता. काही कळायच्या आत वर्षा गायकवाड यांच्या वाहनावर टेम्पो धडकला. वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग किंचित घासल्या गेला. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close