आपला जिल्हा

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

बीड — केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे प्रचंड दर वाढवल्याचा सर्वसामान्य नागरिकांना जबरदस्त फटका बसू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. केंद्राच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात निदर्शने करण्यात येत आहे. आज बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. महिलांनी केंद्राचा निषेध करत कार्यालयासमोर चुली पेटवून भाकरी थापल्या. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर दररोज वाढत आहेत.या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला.या भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात निदर्शने करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातही अनेक तालुक्यात राष्ट्रवादीने आंदोलन केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र निदर्शने करत केेंद्र सरकारचा निषेध केला. या वेळी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून भाकरी थापल्या. या आंदोलनात माजी आ. सुनिल धांडे, डी.बी. बागल, उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, तालुकाध्यक्ष विनिश उबाळे, भाऊसाहेब डावकर, के.के. वडमारे, कल्याण आखाडे, रमेश चव्हाण, खुर्शीद आलम, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, संगिता तुपसागर, किसान सभेचे सुनिल पाटील, ऍड. हेमाताई पिंपळे, बळीराम गवते, प्रज्ञाताई खोसरे, कमलताई निंबाळकर, विद्याताई जाधव, पंकज बाहेगव्हाणकर, सचिन शेळके, जयमल्हार बागल, कुंदन काळे, नंदकुमार कुटे, माऊली सानप, शेख मेहेराज यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close