देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारे ; हुकुमशहाच्या यादीत समावेश — आर एस एफ

नवी दिल्ली — प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील लोकप्रियता व खोट्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची शिकार करत असल्याचं सांगत त्यांना हुकूमशहांच्या पंक्तीत रिपोटर्स सॅन्स फ्रण्टीयर्स (आरएसएफ) या संस्थेन स्थान दिल आहे‌

रिपोटर्स सॅन्स फ्रण्टीयर्स (आरएसएफ) ही संस्था जगभरातील प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवण्याचे काम करते. याच संस्थेने प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश केलाय.प्रिडेटर्स ऑफ प्रेस फ्रिडम म्हणजेच प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची शिकार करणाऱ्या नेत्यांच्या यादीबरोबरच निर्दयी गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्येही मोदींचा समावेश करण्यात आलाय.मोदी हे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या इकोसिस्टीमच्या मदतीने त्यांना विरोध करणाऱ्या प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करत असल्याचं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे जगभरामध्ये आपल्या हुकुशाही वागणुकीसाठी ओळखला जाणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यासारख्या नेत्यांच्या यादीत मोदींचाही समावेश करण्यात आलाय.
प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जगभरातील ३७ मोठ्या नेत्यांची यादी तयार करण्यात आली आहे.यामध्ये इराणचे अली खामेनी, सिरीयाचे बशर अल असद, म्यानमार लष्कराचे जनरल मीनन आऊंग हिलींग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचाही समावेश आहे.
मोदींचा उल्लेख प्रिडेटर सिन्स टेकिंग ऑफिस म्हणजेच सत्तेत आल्यापासून प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारे नेते असा करण्यात आलाय.तसेच या अहवालाच्या सुरुवातील देण्यात आलेल्या प्रस्तावनेमध्ये प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यासंदर्भातील जागतिक यादीमध्ये भारताचा क्रमांक २०२१ साली १८० पैकी १४२ वा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.आरएसएफच्या या यादीवर भारत सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close