ब्रेकिंग

मोदी मंत्रिमंडळात आज शपथ घेणाऱ्या 43 मंत्र्यांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश

नवी दिल्ली — गेल्या अनेक दिवसांपासून मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू होती. आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कॅबिनेट विस्तारात ४३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. कॅबिनेट विस्तारात १० मंत्र्यांचे प्रमोशन करण्यात आले असून मंत्रिमंडळात ३३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डाॅ. भारती पवार, कपिल पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा माध्यमांमधून चर्चिली जात होती मात्र पंकजा मुंडे यांनी डॉ. प्रीतम मुंडे या मुंबईतच असल्याचं ट्वीट केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
43 जणांच्या यादीत यांचा समावेश

१. नारायण राणे
२. सर्बांनंद सोनोवोल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंग
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपति कुमार पारस
८. किरण रिजाजू
९. राजकुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मनसुख मंदाविया
१२. भूपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपेला
१४. जी. किसन रेड्डी
१५. अनुराग सिंग ठाकूर
१६. पंकज चौधरी
१७. अनुप्रिया सिंग पटेल
१८. सत्यपाल सिंग बघेल
१९. राजीव चंद्रशेखर
२०. शोभा करांडलाजे
२१. भानूप्रताप सिंह वर्मा
२२. दर्शना विक्रम जरदोश
२३. मीनाक्षी लेखी
२४. अन्नपूर्णा देवी
२५. ए. नारायणस्वामी
२६. कौशल किशोर
२७. अजय भट्ट
२८. बी. एल. वर्मा
२९. अजय कुमार
३०. चौहान देवुसिंह
३१. भगवंत खुबा
३२. कपिल पाटील
३३. प्रतिमा भौमिक
३४. डॉ. सुभाष सरकार
३५. डॉ. भागवत कराड
३६. डॉ. राजकुमार सिंह
३७. डॉ. भारती पवार
३८. बिश्वेश्वर तुडू
३९. शंतनू ठाकूर
४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई
४१. जॉन बारला
४२. डॉ. एल. मुरुगन
४३. निसिथ प्रामाणिक

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close