राजकीय

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन; विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक हालचालींना वेग

मुंबई — विधानसभेत आज झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर मात्र राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे संख्याबळ कमी झाल्याचा फायदा उठवत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याची हालचाल सुरू झाली आहे

अधिवेशनाच्या आधीपासूनच अध्यक्षपदाची निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती. या निवडणुकीत व्हिप लागू होत नाही तसेच गोपनीय पद्धतीने मतदान होत असल्यामुळे आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात धाकधूक होती. मात्र आता भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी झाल्यामुळे महा विकास आघाडी ला दिलासा मिळाला आहे.
चोवीस तासांच्या आत नोटीस देऊन ही निवडणूक घेता येत असल्याने त्यासाठी महाआघाडी सरकारमधील चाणक्य आता कामाला लागले आहेत.
अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका ठरविताना ही निवडणूक घेण्याचे नियोजन नव्हते. मात्र आता विधानसभेतील भाजपचे बळ हे 106 वरून बाराने कमी झाली आहे. या निलंबनानंतर भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडी
या अनुकूल परिस्थितीत आहे फायदा घेईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठक झाली. काॅंग्रेस जे नाव देईल, ते मंजूर करण्याचे ठरले आहे. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर यांच्या नावाची चर्चा आहे. अजून काॅंग्रेसने आपले नाव निश्चित केलेले नाही. पण सध्याची सभागृहातील परिस्थिती पाहता काॅंग्रेसही वेगाने हालचाल करून पक्षश्रेष्ठींकडून नावास संमती आणेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close