आपला जिल्हा

बीड शहरात सकल मराठा भवन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा; नगराध्यक्षांनी खा. संभाजी राजेंना दिले निवेदन

बीड — खा.छत्रपती संभाजीराजे हे सध्या महाराष्ट्रभर मराठा आरक्षण संदर्भात समाजबांधवांशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दरम्यान काल यानिमित्ताने बीड शहरात त्यांचे आगमन झाले असता नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड शहराचे प्रथम नागरिक त्यांचे स्वागत केले.यावेळी खा. संभाजी राजेंनी बीड शहरात सकल मराठा भवन च्या बांधकामासाठी खासदार फंडातून एक कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षांनी निवेदन देऊन केली आहे. यावेळी कोविडमुळे १२ ते १३ कोटी रुपयांचा खासदार फंड शिल्लक असल्याचे सांगत ज्यावेळी हा फंड मिळेल त्यावेळी आकडा सांगत नाही मात्र बीड च्या सकल मराठा भवन उभारणीसाठी फंड कमी पडू देणार नसल्याचे खा.संभाजीराजेंनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी ठराव घेणारी महाराष्ट्रातील बीड नगर परिषद ही पहिली नगर परिषद आहे. समाजासाठी सकारात्मक भूमिका ठेवणारी बीड नगर परिषद आहे.बीड येथे सकल मराठा भवन बांधकामासाठी बीड नगर पालिकेने जागा उपलब्ध करून दिलेली असून त्यावर सकल मराठा भवन बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सदर भवनामध्ये समाजापयोगी जसे ई- लायब्ररी व इतर सारख्या सुविधा करण्यात येणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे सकल मराठा भवन उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नगराध्यक्षांनी निवेदन दिले. यावेळी न.प.चे बांधकाम सभापती विनोद मुळुक, किशोर पिंगळे, सुभाष सपकाळ, ऍड. महेश धांडे, रवी शिंदे, विठ्ठल गुजर आदी.उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close