आरोग्य व शिक्षण

आ.संदिप भैय्यांच्या मागणीची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी  घेतली दखल ;लातुरच्या धर्तीवर ऑटीजम सेंटर बीडमध्ये उभारले जाणार

बीड —  लातुरसारखे ऑटीजम सेंटर्स (स्वमग्नता उपचार व पुर्नवसन केंद्र) बीडमध्ये सुरू करण्यात यावे अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. आ.संदिप भैय्यांची मागणीची दखल घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ बीडमध्ये ऑटीजम सेंटर सुरू करण्यात तत्वत: मान्यता देवून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

लातुरमध्ये देशातील पहिले स्वमग्नता व तत्सम आजारावर योग्य निदान व उपचार करणारे केंद्र (ऑटीजम सेंटर) सुरू करण्यात आले. यामध्ये स्वमग्नता, बहु विकलंगता, अति चंचलपणा यासारखे आजार कायम स्वरूपी नसून त्याचे वेळीच निदान करून योग्य उपचार केल्यास त्यावर सहज मात करून बालकांना सामान्य जीवन व्यतित करता येवू शकते. यासाठी अशा ऑटीजम सेंटरची बीडमध्ये आवश्यकता असून त्यास मंजुरी देवून तात्काळ असे केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधांसह सेंटर उभारण्याचे भाऊंचे निर्देश
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये आले होते. यावेळी लातुरच्या धर्तीवर ऑटीजम सेंटरर्स उभारण्यात यावे अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत पालकमंत्री धनुभाऊंनी शासकीय विश्रामगृह येथेच जिल्हाधिकारी जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत कुंभार यांना तात्काळ निर्देश देत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत तात्काळ प्रस्ताव सादर करा, अत्याधुनिक सुविधांसह हे सेंटर उभारून त्याच्या सुविधा देवू असे सांगितले. या सेंटरला तत्वत: मान्यता धनुभाऊंनी दिली असल्याने आ.संदिप भैय्यांनी त्यांचे आभारही मानले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close