आपला जिल्हा

इलेक्ट्रिक मोटर सायकलच्या शोरूमला आग ;अंदाजे दहा लाखाचे नुकसान

अंबाजोगाई — प्रशांत नगर भागात असलेल्या “जगदाळे मोटर्स” या मोटरसायकलच्या इलेक्ट्रिक शोरूम ला शुक्रवार दि. ०२ जुलै रोजी दुपारी दोन वाजता आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

प्रशांत नगर भागात असलेल्या ओकीनावा इलेक्ट्रिकल मोटर सायकल शोरूम मध्ये असलेल्या मोटरसायकलच्या हेवी लिथेनियम बॅटरीचा स्फोट होऊन शोरूमला , आग लागली. आगीच्या ज्वाला धुरासह उंच उठू लागल्यामुळे बघणारांची मोठी गर्दी झाली होती.
या आगीमध्ये शोरूम मध्ये उभ्या असलेल्या 6 मोटरसायकलसह इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

शोरूमला लागलेल्या आगीमध्ये शोरूमचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लागताच घटनास्थळी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी तात्काळ पोहोचल्यामुळे आग आटोक्यात येवून आजूबाजूच्या दुकानाला लागणारी आग आटोक्यात आली व जीवित हानी टळली.

या आगीच्या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी तात्काळ वीज बंद करण्याची सूचना महावितरण कंपनीस केली फिडरवरील वीजपुरवठा तात्काळ खंडित झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close