क्राईम

केज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या

परळी — केज तालुक्यातील पिंपळगाव येथील शिक्षक गेल्या चार पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याच्या पोस्ट सोशल मिडिया तून प्रसारित होत होत्या. या शिक्षकाने नैराश्यातून परळीत रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत आज दि.१रोजी रात्री ९ वा.ग्रामीण पोलीसांनी ओळख पटवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,केज तालुक्यातील पिंपळगाव येथील चंद्रहास उत्तम घोळवे या इसमाने धर्मापुरी रस्त्यावर रेल्वे फाटक क्र.२४ जवळ रेल्वे पटरीवर झोपुन आत्महत्या केली आहे.या परिसरात त्याची मोटारसायकल आढळून आल्यावर शोध घेतला असता आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोशि पांचाळ हे करीत आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close