आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक: लग्न समारंभ करण्यापूर्वी करावी लागणार कोरोना चाचणी

बीड — राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या नगण्य होत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या गेल्या दहा-बारा दिवसापासून जैसे थे च आहे. आज आखेर कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नवीन आदेश काढत आणखी निर्बंध लादले आहेत. यापुढे आता विवाह सोहळा करण्यापूर्वी वधू-वरां सोबत सोहळ्यासाठी हजर राहणाऱ्या पन्नास लोकांना देखील कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.

सध्या जिल्ह्यातील कोरोनाची रूग्णसंख्या घटत नसल्याने अखेर जिल्हाधिकार्‍यांनी नवी निर्बंध लागू केले आहेत. आज काढलेल्या आदेशामध्ये पोलिसांची परवानगी न घेता विवाह सोहळे साजरे होत आहेत. या विवाह सोहळ्याला मोठी गर्दी जमत आहे. विवाह सोहळ्यामध्ये कोरोना नियम सर्रास पायदळी तुडवली जात आहेत
त्यातूनच कोरोना नियंत्रणात येण्याऐवजी फोफावू लागला आहे. यापुढे आता विवाह समारंभ आयोजकांनी मंगल कार्यालयाची पूर्वनोंदणी करावी, एका दिवशी एकच विवाह त्या मंगल कार्यालयामध्ये होईल, विवाह आयोजकांना मंगल कार्यालय, मॅरेज हॉल उपलब्ध न झाल्यास त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन विवाह लावावा, स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी देते वेळेस विवाहाला उपस्थित राहणाऱ्या 50 लोकांच्या नावाची यादी घेवून त्यांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल घेवूनच परवानगी द्यावी.स्थानिक पोलिसांनी जी परवानगी दिली आहे. त्या 50 लोकांची यादी पोलीस प्रशासनाच्या परवानगीचे पत्र ग्रामपंचायत किंवा नगर पालिकेमध्ये दाखल करावे असे आदेश जारी केले आहेत. विवाहाप्रसंगी प्रत्येकाला मास्क बंधनकारक असणार आहे, सॅनिटायझरचा वापर होणे आवश्यक आहे. भोजन व्यवस्थेमधील सामाजिक
आंतर राखणे महत्वाचे ठरणार आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. जर अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close