क्राईम

सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांसह खाजगी इसमास लाच घेताना एसीबीने पकडले

परळी — तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राखेचे टिप्पर चालू द्यावा यासाठी 6 हजारांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका खासगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उस्मानाबाद शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दि.23 जून रोजी दुपारी सिरसाळ्याच्या सोनपेठ चौकात करण्यात आली.
सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तक्रारदाराचे राख वाहतूक करणारे तीन टिप्पर चालू देण्यासाठी पोलीस शिपाई उमेश यशवंत कनकावार वय 31वर्ष आणि गजानन अशोक येरडलावर वय 32 वर्ष या दोघांनी 9 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 6 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. याची तक्रार उस्मानाबाद एसीबीला प्राप्त झाली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने उस्मानाबाद एसीबीने तक्रारीची पडताळणी केली आणि बुधवारी दुपारी सिरसाळ्याच्या सोनपेठ चौकात सापळा रचला. यावेळी पोलीस शिपाई उमेश कनकावार आणि गजानन येरडलावर यांच्या वतीने 6 हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसम नदीम मोसीन पठाण वय 26 वर्ष रा.पठाण गल्ली सिरसाळा याला उस्मानाबाद एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात तिन्ही लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक मारुती पंडित, उस्मानाबादचे उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, अर्जुन मारकड, चालक दत्तात्रय करडे यांनी पार पाडली.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close