आरोग्य व शिक्षण

सेरो सर्वेक्षणासाठी बीडमध्ये पथक दाखल; १० गावांतील ५०० लोकांचे घेणार रक्त नमुने

बीड — इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या वतीने सेरो सर्वेक्षणाचा चौथ्या टप्यात सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी सोमवारी पथक जिल्ह्यात दाखल झाले. दिवसभरात जिल्ह्यातील वेगवेगळ्या १० गावांतील ५० लोकांचे रक्त नमुने घेण्याचे काम सुरु आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सेरो सर्वेक्षण केले आहे. यात राज्यातील बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, सांगली, जळगाव या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात जावून नागरिकांचे रक्त नमुने घेतले जात आहेत. यासाठीच सोमवारी जिल्ह्यातील १० गावांत पथक जावून रक्त नमुणे घेतले जात आहेत. तसेच पहिल्यांदाच जिल्हा रूग्णालयातील १०० आरोग्य कर्मिंचेही रक्त नमुणे घेतले जाणार आहेत. जिल्ह्यातून ५०० नमुने घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढून नियोजन केलेले आहे.

 दहा गावांत होतेय सर्वेक्षण-
बीड तालुक्यातील येळंबघाट, आंबेसावळी, पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा, आष्टी तालुक्यातील डोंगरगन, गेवराई तालुक्यातील पांढरवाडी, माजलगाव तालुक्यातील एकदरा, धारूर तालुक्यातील हिंगणी खूर्द, परळी तालुक्यातील धर्मापूरी, माजलगाव शहरातील वॉर्ड क्रं. ४, केज शहरातील वॉर्ड क्रं.७ येथील नागरिकांचे रक्त नमुने घेतले आहेत.

जिल्ह्यातील १० गावांतून नमुने घेतले आहेत. अद्यापही हे काम सुरू आहे विशेष म्हणजे आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही यावेळी सॅम्पल घेण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आर. बी. पवार यांनी दिली.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close