आपला जिल्हा

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित

परळी — कोविड काळात कार्य करणाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सेवागौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

गेल्या वर्षेभरापासून कोविड विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कोविड काळात पंचायत समितीच्या माध्यमातून गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी शासनाच्या नियमांची ग्रामीण भागात काटेकोर अंमलबजावणी केली. तसेच आशा, गटप्रवर्तक यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात, शहरात विविध सर्वेक्षण करुन कोविड विषाणूचा संसर्ग कमी करण्यास मदत केली. या सर्व कार्याची दखल घेत सोमवारी (दि.२१) सायंकाळी हालगे गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते सेवागौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह आ.संजय दौंड, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, राष्ट्रवादी युवकचे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाईचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, तहसीलदार सुरेश शेजुळ, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, उपसभापती जानिमियाँ कुरेशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व इतरांची उपस्थिती होती. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांना कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल सेवागौरव (कोरोना योध्दा) पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्ततरातून अभिनंदन होत आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close