महाराष्ट्र

छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त ऑनलाईन व्याख्यान मालेचे आयोजन

बीड  — राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोहत्सव २०२१ चे आयोजन मुप्टा प्रबोधन ने केले असून २१ जून ते २६ जून या दरम्यान रात्री ८ वाजता. ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. हे व्याख्यान मुप्टा प्रबोधन या फेसबुक पेज वरून लाईव्ह करण्यात येणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुप्टा प्रबोधनचे मुख्य संयोजक सुनील मगरे, प्रा.प्रदीप रोडे, प्रा. डॉ.हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा.डॉ.पंचशील एकंबेकर आदींनी केले आहे.

दि.२१ जून रोजी रात्री ८ वाजता
प्रा.डॉ.हर्षवर्धन कोल्हापुरे ( जिल्हा अध्यक्ष , मुप्टा संघटना,लातूर)
विषय —  राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
दि.२२ जून रोजी रात्री ८ वाजता प्रा.डॉ.संदेश वाघ (इतिहास व पुरातत्व अभ्यासक मंडळ,मुंबई विद्यापीठ)
विषय — राजर्षी शाहू महाराजांचे सुधारात्मक धोरण.
२३ जून रोजी रात्री ८ वाजता प्रा.सुधीर गव्हाणे (माजी कुलगुरू समताधर्मी औरंगाबाद)
विषय — समता सम्राट राजर्षी शाहू महाराज.
२४ जून रोजी रात्री ८ वाजता प्रा.डॉ.अशोक राणा (राष्ट्रीय अध्यक्ष – जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद)
विषय:- राजर्षी शाहू महाराज यांचे आपत्ती व्यवस्थापन.
२५ जून रोजी रात्री ८ वाजता इंजी. मिलिंद बनसोडे (औरंगाबाद)
विषय— राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधार.
२६ जून रात्री ८ वाजता
मा. रविंद्र जोगदंड.
(जीएसटी- उपायुक्त औरंगाबाद)
विषय — महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ : राजर्षी शाहू महाराज या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या सर्व व्याख्यानाचा लाभ मुप्ता ऑनलाईन पेज वरून घ्यावा असे आवाहन मुप्टा प्रबोधनचे मुख्य संयोजक सुनील मगरे, प्रा.प्रदीप रोडे, प्रा. डॉ.हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा.डॉ.पंचशील एकंबेकर यांच्या सह मुप्टा – मराठवाडा विभाग,सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close