क्राईम

पत्नीने पगाराच्या हिशोबाचा तगादा लावला, वनरक्षकाची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल

आष्टी — लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पतीच्या मागे लावला . तसेच आई – वडिलांना पैसे दिल्यामुळे तिने पतीला मारहाणही केली आणि शेती माझ्या नावावर कर म्हणून सतत त्रास देऊ लागली . पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने अखेर दिड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली . याप्रकरणी पत्नीसह चौघांवर शनिवारी ( १ ९ जून ) आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला . अनिल आबासाहेब जगताप ( रा . टाकळसींग , ता . आष्टी ) असे त्या मयत वनरक्षकाचे नाव आहे . त्यांचे वडील आबासाहेब जगताप यांच्या फिर्यादीनुसार अनिल यांचा विवाह २०१४ साली देसूर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता . अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरूर का . येथे राहण्यासाठी गेले . त्यानंतर पती – पत्नीत सातत्याने वाद होऊ लागला . लग्ना अगोदरच्या पगारच्या खर्चाचा हिशोब ती मागू लागली . तसेच तुमच्या आई – वडिलांना पैसे द्यायचे नाही असेही तिने बजावले . दरम्यानच्या काळात बदलीमुळे ते कडा येथे राहण्यासाठी आले . त्यानंतर आई – वडिलांना घरासमोर फरशी करण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलच्या डोक्यात तुंबा मारला होता . याबाबत अश्विनीच्या आई – वडिलांना कळवले असता त्यांनी मुलीचीच बाजू लावून धरली . तीन वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले .
आष्टीत स्थायिक झाले . त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करून दे असा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला . यावर्षी मे महिन्यात अश्विनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली . अनिलने वारंवार फोन करूनही तिने परत येण्यास नकार दिला . जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही असे तिने अनिलला बजावले . अखेर या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने २८ मे रोजी दुपारी शृंगेरी देवी समोरुन जाणाऱ्या मुगगाव रोडवर एका वडाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत नमूद आहे . ही घटना २ ९ मे रोजी उघडकीस आली . दरम्यान सदर फिर्यादिवरून अजिनाथ देवराव भवर , विजुबाई अजिनाथ भवर , अश्विनी अनिल जगताप आणि महेश अजिनाथ भवर या चौघांवर शनिवार दि.19 जून रोजी अनिलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close