देश विदेश

तेरा वर्षात प्रथमच स्विस बँकेत भारतीयांची रक्कम तीन पटीने वाढली

झुरीच — स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेत ( स्विस बँक ) भारतीय उद्योजक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये २०२० या वर्षात प्रचंड वाढ झाली आहे . भारतीय उद्योजक आणि कंपन्यांनी केलेली रोखे आणि इतर गुंतवणूक मिळून खात्यातील मूल्य तब्बल २० हजार ७०० कोटीवर ( २.५५ अब्ज स्विस फ्रैंक ) गेले आहे . वर्षभरात खात्यातील रक्कम तब्बल तीन पटीने वाढली आहे.
स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने नुकताच त्यांच्याकडील खात्यांच्या शिलकीचा तपशील जाहीर केला . ज्यात भारतीय आणि भारतीय कंपन्यांची स्विस बँकेत जी खाती आहेत त्यातील एकूण रक्कम २० हजार ७०० कोटींवर गेली आहे . २०१ ९ मध्ये या खात्यांमध्ये ६६२५ कोटीची रक्कम होती . तर त्याआधी दोन वर्षे त्यात घसरण झाली होती . मात्र २०२० मध्ये खात्यातील शिल्लक प्रचंड वाढली असून गेल्या १३ वर्षांत पहिल्यांदाच भारतीयांची जमा शिल्कक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे .

प्रत्यक्ष खातेदारांकडून होणाऱ्या जमा रकमेत घसरण झाली असली तरी त्यांनी गुंतवणूक केलेल्या पर्यायांमधील गुंतवणूक मूल्यात मात्र वाढ झाली आहे . भारतीयांच्या एकूण २०७०० कोटींपैकी जवळपास ५०३.९ दशलक्ष स्विस फ्रैंक ( ४००० कोटी ) ग्राहकांच्या ठेवी आहेत . ३८३ दशलक्ष स्विस फ्रैंक ( ३१०० कोटी ) इतर बँकाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहेत . तर जवळपास २ दशलक्ष स्विस फ्रैंक ( १६.५ कोटी ) ट्रस्टच्या माध्यमातून ठेवले आहेत आणि १६६४.८ दशलक्ष स्विस फ्रैंक ( १३५०० कोटी ) बॉण्ड , सिक्युरिटीज आणि इतर पर्यायी गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवण्यात आले आहेत .
स्विस बँकेत भारतीयांच्या खात्यात असलेली रक्कम आणि संपत्तीला स्वित्झर्लंड सरकार काळा पैसा ग्राह्य धरत नाही . मात्र भारत सरकारला कर चोरी आणि आर्थिक घोटाळ्यात स्वित्झर्लंड सरकारकडून सहकार्य केले जाते . २०१८ पासून दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाण घेवाण करण्याचा करार आहे .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close