महाराष्ट्र

अजितदादा… बीडमध्ये गूंड नंग्या तलवारी घेऊन फिरु लागले;एस पी सह आघाडीची वेशीला टांगू लागले

बीड — दादा ….पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी अधीक्षक पदाचा कारभार हाती घेतल्यापासून बीडची कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. वाळूमाफियांनी नदी सोबतच रस्त्यांची चाळणी केली आहे. त्या वाळूमाफिया समोर आख्खी पोलीस यंत्रणा लोटांगण घालत आहे. यासोबतच गुटका माफिया, अवैध दारू विक्री मटका जुगार या धंद्यांची लॉकडाऊन काळातदेखील चलती होती. हे धंदे राजरोस चालत राहिले पण पोलिसांनी सर्वसामान्यांसह, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, बियाणे खरेदीसाठी शहरात आलेल्या शेतकऱ्यांना बेदम झोडपून काढले.परळीत माथेफिरूने अनेकांच्या गाड्या मध्य रात्री फोडल्या, तर बीडच्या पेठ बीड भागात 50 – 60 गुंडांच्या टोळक्याने मोटार सायकल वर बसून हातात नंग्या तलवारी घेत लॉंग मार्च काढला. पोलिसांकडे तक्रार करावी तर पोलिसच गुंडांचे खबरे म्हणून काम करत आहेत एकंदरच सर्वसामान्य माणूस दहशतीच्या वातावरणात जगत आहे. दादा जनतेचं जीवन भकास करणारा हाच का तुमचा विकास ? शुक्रवारी तुम्ही घेत असलेल्या बैठकीत कायदा सुव्यवस्थेचाही आढावा घ्या ? जिल्ह्यावासीयांची ‘राजा’ च्या रझाकारीतून सूटका करा अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद येथील जनतेला झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकलाच नाही. विकासाच्या नावाने निधी अभावी बोंब सध्या झाली असली तरी बीडच्या महसूल व पोलीस प्रशासनाने जिल्हा भकास कसा होईल याकडे लक्ष दिले. विशेषत: पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या कारकीर्दीत तर त्यात आणखी भर पडली. दादा… तुम्ही जिल्ह्यात आलाच आहात तर गोदावरी,सिंदफणा काठावरील गावां चा दौरा करा बीड माजलगाव, गेवराई तालुक्यातील गावांना भेटी द्या वाळूमाफियांनी अख्या रस्त्याची चाळणी केली आहे. राजा रामा स्वामींची पोलीस या वाळूमाफियांचे खबरे म्हणून काम करू लागली आहे. वाळू तस्करी बद्दल एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केली तर याची पहिली खबर माफियांना जाते. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन धमकावले जाते. रस्त्यांची चाळणी एवढी झाली आहे की एखादा रुग्ण किंवा गरोदर स्त्री सुखरूप हॉस्पिटल पर्यंत पोहोचेल की नाही अशी स्थिती झाली आहे. किरकोळ अपघात तर नेहमीचेच आहेत. दादा या रस्त्यावरून एकदा फिरा दुसऱ्या दिवशी कमरेला पट्टा लावावा लागला नाही तर मग बोला असं आता जनतेतून उपरोधिक पणाने बोललं जाऊ लागलं आहे. अवैध दारू,वाळू तस्करी,गूटखा माफिया,जूगार अड्डे लाॅकडाऊनच्या काळात सन्मानाने सूरू होते.तर कायदा हा सर्वसामान्य जनतेसाठी होता. या काळात हॉस्पिटल मध्ये जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना, अत्यावश्यक सेवेत असलेल्या डॉक्टर, नर्स, मेडिकल दुकानदार पोलिसांनी झोडपून काढले शिवाय यांच्याकडून पैसेही लुबाडले.दवाखान्यात उपचारासाठी जाणारे रूग्ण ही पैसे घेतल्याशिवाय पोलिसांनी सोडले नाहीत. एकंदरच रझाकारीचा अनुभव जनतेने घेतला. गृहमंत्र्यांना शंभर कोटी मागितल्याच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला.खरच पोलिसांना मंत्र्यांना पैसा पूरवावा लागत असावा असा विश्वास बीडच्या जनतेला आता वाटू लागला आहे कारण पोलिसांनी परिस्थिती तशी निर्माण केली आहे. पत्रकारांना अरेरावीची भाषा करणारा पेठ बीडचा विश्वास पाटील राजारामास स्वामींचा खास माणूस याच्या खातेनिहाय चौकशा सुरू असल्या तरी ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या पीडित व्यक्तीलाच धमकावण्याचे काम करतो. अवैध धंद्यावाल्या विरोधात मात्र शेपूट घालतो. सहा दिवसापूर्वी याच्याच ठाण्याच्या हद्दीत 50–60 गुंडांनी हातात नंग्या तलवारी घेत मोटार सायकलवरून लाॅंग मार्च काढला. दहशतीचे वातावरण तयार केले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.पण ठाणे प्रमूख पाटलाने कूठलीच कारवाई अद्याप केली नाही. सामान्य व्यक्ती ने झाल्या प्रकाराची तक्रार करावी तर पाटीलच धमक्या एरवी देतो.गूंड अंगावर घालण्याच काम करतो. एस पी तर अशा अधिकाऱ्यांना बिदागी जास्त मिळते म्हणून पायघड्या घालतो. तर दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण होतो? परळीचच उदाहरण घ्या तिथे देखील एका माथेफिरूने रात्रीच्या वेळी 25 ते तीस गाड्या अक्षरशः फोडल्या याप्रकरणात देखील अद्याप कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाही
जनतेला लुटणारी पोलीस रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग कशी करत नव्हती? असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत. एकूणच महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काहीतरी अच्छे दिन निर्माण होतील अशी अपेक्षा दादा जनतेला होती त्यामुळे भरभरून मताच दान जनतेनं राष्ट्रवादी च्या झोळीत टाकलं. जनतेचा महा विकास तर झालाच नाही पण परस्थिती महा ‘भकास ‘झाल्याचं चित्र सध्या पहावयास मिळत आहे. तुम्ही जिल्ह्यात आल्यानंतर बैठक घेणार आहात यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा देखील आढावा घ्या. येथील जनतेला काहीसा तरी दिलासा मिळेल असे निर्णय घ्या अशी मागणी जनतेतून आता होऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close