क्राईम

धूळे सोलापूर महामार्गावर कंटेनर पलटला; स्थानिकांकडून 75 लाखाची लूट

उस्मानाबाद — बंगळूरहुन दिल्लीकडे जाणारा कंटेनर पावसामुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे तीन वाजता पलटी झाला. ही घटना तेरखेडा नजीक घडली. अपघाताची माहिती मिळताच जवळच्या वस्तीवरील लोकांनी गाडीतला जवळपास 75 लाख रुपयांचा माल लूटून नेला. गाडी चालकाने समोरची काच फोडून बाहेर येत बाहेर येत आपला जीव वाचवला.
बंगळुरूहून ई कॉमर्स कंपनीचा माल घेऊन एक कंटेनर दिल्लाकडे निघाला होता . त्यात लॅपटॉप , मोबाईल हँडसेट , बॅटरीज , हेडफोन , कपडे असा 75 लाखांचा माल होता. कंटेनर तेरखेडा जवळ आला असता रिमझिम पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटून पलटी झाला. दरम्यान याची माहिती स्थानिकांना मिळताच लोकांनी अक्षरशः कंटेनरमधील मालाची लूट केली. या प्रकारानंतर लोकांनी पळवलेला माल ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला . तरीही पोलिसांना गायब झालेला सगळा माल ताब्यात घेण्यात यश मिळाले नाही . सुमारे 40 लाखांचा माल अद्याप गायब आहे.या प्रकरणी चोरीला गेलेल्या मालाचा तपास लावण्याच काम पोलिस करत आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close