क्राईम

बीड- परळी मार्गावर कार ट्रॅव्हल्स अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू

बीड — बीड परळी महामार्गावर वडवणी जवळ कार व ट्रॅव्हल्स ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ग्रामसेवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.

राजेंद्र मुंडे (ग्रामसेवक) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बुधवारी पहाटे राजेंद्र मुंडे हे आपल्या कार क्र.एम एच ०२ सिपी ५२२६ ने वडवणी कडून बीड कडे येत होते. याच दरम्यान नेहरकर हॉटेल जवळ आल्यानंतर बीड कडून वडवणी कडे येणारी ट्रॅव्हल्स क्र.एम एच २९ व्ही ७२२७ ची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. मुंडे हे वडवणी तालुक्यातील देवडी येथील ग्रामसेवक होते. कार्यालयीन कामाच्या निमित्ताने बुधवारी सकाळीच ते वडवणी येथून बीड कडे आपल्या कामानिमित्ताने निघाले होते.
घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close