क्राईम

लॉकडाऊन काळात व्यवसाय धोक्यात आल्याने कापड व्यापाऱ्याची चौसाळ्यात आत्महत्या

बीड — कोरोना संकटामुळे लावलेल्या लाॅकडाऊन काळात अनेकांचे व्यवसाय धोक्‍यात आले. त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तून चौसाळ्यातील एका कापड व्यापाऱ्यांने गळफास आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीश गणेश शिंदे वय 39 वर्ष असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. गिरीश शिंदे याचे चौसाळा येथे कपड्याचे दूकान आहे. गेल्या वर्षभरात कोरोना संकटामुळे लाॅक डाऊन लावण्यात आले.सतत दूकान बंद रहात असल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत गिरीश शिंदे असायचे. या विवंचनेतून त्यांनी सोमवारी रात्री उशीरा घरातील सर्व मंडळी जेवण करून झोपली असता गिरीश शिंदे यांनी
दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत्या घरी दरवाज्याच्या कडीला दोरी व टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री दोन वाजता गिरीश यांची आई या वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यावेळी आरडाओरड केल्यानंतर कुटुंबातील सर्व लोक धावत आले व त्यांनी गिरीश यांचा गळफास काढून त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. गिरीश यांनी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केली असल्याची नोंद नेकनूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close