आपला जिल्हा

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची अचानक परळी उपजिल्हा रुग्णालयास भेट

परळी — शहरातील उपजिल्हा रूग्णालयास बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आज मंगळवार दि.15 जून रोजी अचानक भेट देऊन आरोग्य विभागाचा आढावा घेतला.

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गिते यांची अचानक बदली झाली. त्यांच्या जागी माजलगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश साबळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार स्विकारला आहे. आज परळी शहरातील उपजिल्हा रुग्णालय प्रथमच भेट दिली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोवीड सेंटर तसेच विविध आरोग्य विषयक महत्त्व पुर्ण विषयावर त्यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रेणेला सुचना ही देण्यात आल्या आहेत. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दिनेश कुरमे, डॉ. अर्षद शेख व इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close