क्राईम

रेखावारांनी सांभाळलेलं पुरवठ्यातल किडू (ठाणगे )अखेर शेण खाताना एसीबीने पकडलं

बीड — सह्याद्री माझा ने नेहमीच पुरवठा विभागातील निरीक्षक रवी ठाणगे च्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला. मात्र प्रत्येक वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ठाणगे ची पाठराखण केली. परिणामी त्याचा मूजोरपणा वाढतच गेला. शेवटी त्याच्या पापाचा घडा भरला. रेशन दुकानदारांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणगे रंगेहात पकडला.
बीडच्या पुरवठा विभागाला रवींद्र सुभाष ठाणगे (पुरवठा निरीक्षक बीड) ची कीड लागली होती. कार्यालयात येणाऱ्या गोरगरिबांना शिव्या घालत राजरोस पैशाची मागणी तो करत होता. अरेरावीच्या जोरावर पुरवठा विभागाचा सर्वच कारभार त्याने हायजॅक केला होता. राशन दुकानदाराचे चलन विक्री करणं असो की, गोदामातून माल गायब करण असो अनेक कृष्णकृत्य ठाणगे करत होता. प्रत्येक वेळी सह्याद्री माझा ने गोरगरिबांना न्याय देण्यासाठी त्याच्या विरोधात आवाज उठवला. परंतु नुकतेच बदलून गेलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्याची पाठराखण केली. असं असताना देखील मी आयुक्तांकडून नियुक्त केला गेलेला असल्यामुळे जिल्हाधिकारी तरी माझं काय वाकडं करणार असं तो पुरवठा विभागात येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे. त्याच्या कडून होणाऱ्या पिळवणूकीमूळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा ढीग साचला होता. पण रेखावारांचा माणूस म्हणून त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे धाडस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवलं नाही. इतकेच नव्हे तर लाच स्वीकारताना चा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याची देखील दखल घेतली गेली नाही. अखेर रवी ठाणगे च्या पापाचा घडा भरला गेला राशन दुकानदारा विरोधात आलेल्या तक्रारी वर कारवाई न करण्याच्या बदल्यांमध्ये रेशन दुकानदारास तब्बल दहा हजाराची लाच मागितली होती. एवढेच नाही तर पैसे दिले नाही तर दुकानाचा परवाना रद्द करेल, अशी धमकी देखील संबंधित रेशन दुकानदाराला दिली होती. संबंधित रेशन दुकानदाराने थेट लाचलूचपत कार्यालय गाठले आणि तेथून मंगळवारी दुपारी तहसील परिसरात लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला.

स्वतःच्याच कार्यालयात स्वीकारले पैसे-
पाठीराखे खंबीर असल्यामुळे कुणाच्या बापाला न घाबरता पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगे याने स्वत:च्याच कार्यालयामध्ये संबंधित दुकानदाराकडून दहा हजाराची लाच घेताना एसीबीच्या अधिकार्‍याने रंगेहात जेरबंद केले. सदरील लाचखोर पुरवठा अधिकारी रविंद्र सुभाष ठाणगे विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडेसह पीआय परदेशी, अमोल बागलाने आदींनी केली.

मोठे मासे गळाला लागणे आवश्यक-

बीड तहसील कार्यालयात कोणत्याही कामासाठी आधी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात नंतरच कामे होतात अशा अनेक तक्रारी यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे झालेल्या आहेत ठाणगे यांच्यावरील कारवाईनंतर तहसील कार्यालयातला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून महसूल विभागातील मोठे मासे गळाला लागणे आवश्यक आहे पुरवठा विभागात बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे अशी मागणी देखील होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close