क्राईम

अंधारात ठेवून एकाची जागा दूसऱ्याच्या नावे केली; ग्रामसेवकाचा प्रताप

पाटोदा — तालुक्यातील धनगरजवळका येथील रहीवाशी बाबासाहेब जयप्पा ढेकळे यांची पी.टी.आर.मिळकत क्र 179/ 2 जागा  सन 1990 पासुन त्यांच्या नावावर असुन ताब्यात आहे तरी चालु रेकॉर्ड प्रमाणे 179/ 2 ही जागा बाबासाहेब जयप्पा ढेकळे यांना न विचारता सरपंच व ग्रामसेवकांनी 2013/ 2014 या साली त्रयस्त (दुसऱ्याच) व्यक्तीच्या नावावर करण्याची करामत केली आहे.
याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात जागेची नोंद रद्द करण्यात यावी असे  बाबासाहेब ढेकळे यांनी  नमुद केले आहे.
प्रकरण यावर न थांबता ही जागा दुसऱ्याने तिसऱ्याला  विक्री केली आहे. 9 मार्च 2021 रोजी रजिस्टरी करण्यात आली आहे त्याची पण नोंद रद्द करण्यात यावी असे गटविकास अधिकारी,तहसिल कार्यालय,उपविभागिय कार्यालय पाटोदा यांना दिलेल्या अर्जात नमुद केले आहे .
हा सर्व महाप्रताप करणारा ग्रामसेवक बदली करून आपल्या गावी विदर्भात गेला आहे तरी त्याच्यावर काय कारवाई होती त्या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही अनुचित प्रकार घड़ल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहील असे पण अर्जात नमुद केले आहे. ..

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close