कृषीवार्ता

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन कृषी विभागाच्या योजनांचा सर्व शेतकर्यांना लाभ मिळवुन देवु- सभापती बालाजी मुंडे

परळी –पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन परळी तालुक्यातील सर्व शेतकर्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मिळवुन देवु असे आश्वासन पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे यांनी दिले. कृषी अधिकारी कार्यालयात आज दि.14 जून रोजी सलग पिक प्रात्यक्षिके आत्मा अंतर्गत शेतकरी गटामार्फत राबवण्यासाठी सोडत काढण्यात आली त्यावेळी मुंडे बोलत होते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा गळीत धान्य व तेलताड अभियान 21- 22 अंतर्गत सलग पिक प्रात्यक्षिके आत्मा अंतर्गत स्थापित शेतकरी गटामार्फत राबविण्यासाठी सोडत पध्दतीने पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे यांच्या हस्ते सोडत पध्दतीने निवड करण्यात आली.यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की कृषी कार्यालय व परळी पंचायत समिती मार्फत शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात कृषी विभागाच्या वतिने शासनाच्या या योजनांचा सर्वसामान्य शेतकर्यांनी फायदा घ्यावा असे सांगीतले.यावेळी कृ.उ.बा.स.संचालक माऊली गडदे,तालुका कृषी अधिकारी ए.ए.सोनवणे,मंडळ अधिकारी एस.एस.गादेकर,मंडळ कृषी अधिकारी एम.बी.कवडे,कृषी पर्यवेक्षक सी.एन.थोन्टे,व्ही.एन.जाधवर,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सौ.के.एल.फड,सहाय्यक व्यवस्थापक व्ही.पी.मिश्रा,व्ही.एम.बीडगर व शेतकरी गट प्रमुख आणी शेतकरी उपस्थित होते.
कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत गट प्रात्यक्षिकांची सोडत सलग सोयाबीन लागवडीचे प्रात्यक्षिके प्रकल्प, तुर सलग लागवड प्रकल्प, सोयाबीन व तूर प्रकल्प यांची निवड उपस्थितांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत व इन कँमेरा या निवड करण्यात आली. कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत आत्मा योजनेत नोंदणीकृत सर्व गटांच्या चिठ्ठ्या एकत्र तयार करून सभापती बालाजी मुंडे, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या उपस्थित करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close