महाराष्ट्र

परळी : सिरसाळा एमआयडीसीला मान्यता मिळाल्याने परळीत आनंदोत्सव

परळी —- : राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेषसहाय्य मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी परळी मतदारसंघातील नागरिकांची अजून एक वचनपूर्ती केली असून बहुप्रतिक्षित शिरसाळा येथे नूतन MIDC उभारणीच्या प्रस्तावाला उद्योग मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. MIDC प्रकल्पाला ऐतिहासिक मंजूरी प्राप्त झाल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवून या घटनेचे स्वागत केले.

परळी मतदारसंघासाठी हा सुवर्णक्षण आहे. आगामी काळात परळी आणि परिसरातील हजारो बेरोजगार युवकांना या महत्वकांक्षी प्रकल्पातून रोजगार निर्मिती होवू शकणार असून नविन उद्योजक तयार होणार आहेत.

यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख,शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,ज्येष्ठ नेते एस.ए.समद,नगरसेवक अय्युबभाई पठाण,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथराव सोलंके,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,युवक शहराध्यक्ष सयद सिराज भाई,ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष के.डी. उपाडे,सामाजिक न्याय आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सावन्त,वकील सेल चे अध्यक्ष मनजीत सुगरे,अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष नाझेरभाई हुसैन,बालाजी वाघ,युवकनेते शंकर कापसे,बळीराम नागरगोजे,प्रा.शाम दासूद सर,रवि मुळे,सामाजिक न्याय आघडीचे युवक अध्यक्ष अमर रोडे,अभिजीत धाकपाडे,अमित केंद्रे,जितेंद्र नव्हाडे,धम्मा आवचारे,सचिन आरसुळे,शरद कावरे,अतुल फड,पप्पु काळे,गणेश सुरवसे,उमेश सुरवसे,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते!

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close