क्राईम

कोरोना टेस्ट पॉझिटिव् येताच पाच जणांचे रुग्णालयातून पलायन

आष्टी — कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार न घेता पाच कोरोना बाधित रुग्णांनी पलायन केल्याची घटना आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी सकाळी साडे आठ च्या सुमारास घडली.
याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आष्टी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
कोरोना ची लक्षणे जाणवत असताना त्रास होऊ लागल्यामुळे पाच जण आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना टेस्ट करण्यासाठी सकाळच्या सुमारास आले होते. यावेळी त्यांची एन्टीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये पाचही जण पॉझिटिव आढळून आले.परंतू या पाचही कोरोना बाधित व्यक्तींना दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेत आरोग्य कर्मचारी गूंतले असता याचा फायदा घेत पाचही जणांनी रुग्णालयातून धूम ठोकली. दरम्यान
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close