आपला जिल्हा

बाप लेका सह भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू

गेवराई — शेततळ्यामध्ये पोहत असताना बुडत असलेल्या मुलाला व भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पोहता येत नसल्यामुळे भाचा व मुलासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दैठण येथे घडली. ही घटना गुरुवारी दुपारी पाच च्या सुमारास घडली.

सुनिल जग्गनाथ पंडित वय 40 वर्ष त्यांचा मुलगा राज पंडित वय 12 वर्ष सुनील पंडित यांचा भाचा आदित्य पाटील वय 10 वर्ष शेततळ्यावर गेले होते.यावेळी राज आणि सुनील यांचा भाचा पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता ते दोघे पाण्यात बुडू लागले.हे पाहून सुनील पंडित यांनी शेततळ्यात उडी मारून या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला.गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण दैठणवर शोककळा पसरली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close