आरोग्य व शिक्षण

पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना बारामती ॲग्रो कडून एनर्जी ड्रिंक; संदीप क्षीरसागरांच्या हस्ते वाटप

बीड — कोरोना संकट काळात रुग्णांवर उपचार सुरू असताना ओरल रिहायड्रेटटिंग सोल्युशन (ओआरएस) बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी दिले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते बुधवारी दि.9 जून रोजी बीड जिल्हा रुग्णालयात ओआरएसचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते हे उपस्थित होते.
मदतीसाठी सरसावले रोहित पवार, 5 हजार ओआरएस दिले भेट
बीड जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पेक्षा अधिक ओआरएस रोहित पवार यांनी पाठवून दिले. यामध्ये बीड जिल्हा रुग्णालय येथील रुग्ण व पोलीस अधीक्षक कार्यालयात हे ओआरएस वाटप करण्यात आले. बुधवारी जिल्हा रुग्णालयात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते त्याचे वाटप करण्यात आले.
यापूर्वी आमदार रोहित पवारांनी केली होती टँकरची मदत-

तीन वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्याचे पाणी गावागावांमध्ये वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी पाण्याचे टँकर दिले होते. आता आरोग्याच्या संबंधी त्यांनी बीड जिल्ह्यासाठी मदत केली आहे, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close