क्राईम

ॲपे रिक्षा पलटी होऊन एक जण ठार

केज — भरधाव वेगाने धारूरकडे जात असलेला अॅपे रिक्षा पलटी झाला. या दुर्घटनेत एक जणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही दुर्घटना केज तालुक्यातील उंदरी या ठिकाणी झाला. याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात ॲपे रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उंदरी येथील बालासाहेब दादाराव ठोंबरे हे कामानिमित्त गावातील विना नंबरच्या अप्पेरिक्षाने सोमवार दि. ७ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धारूरकडे निघाले होते . भरधाव वेगाने रिक्षा घेऊन जात असताना उंदरी – धारूर रस्त्यावरील शिवाजी ठोंबरे यांच्या शेताजवळ चालक विशाल सतीश ठोंबरे याच्या निष्काळजीपणामुळे अॅपेरिक्षा पलटी झाला . या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालासाहेब दादाराव ठोंबरे यांचा मृत्यू झाला . मयताचा पुतण्या प्रशांत सर्जेराव ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून अॅपेरिक्षा चालक विशाल ठोंबरे विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानोबा साठे हे करीत आहेत .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close