आपला जिल्हा

पालकमंत्र्यांची चौथ्यांदा बैठकीकडे पाठ; कशी सुरळीत होणार विकासाची वाट

बीड — जिल्ह्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात आयोजित करण्यात आलेली आढावा बैठक पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे सलग चौथ्यांदा रद्द केल्यामुळे जिल्ह्या समोर असलेले प्रश्न सुटणार कसे? आधीच विकासाची खडतर असलेली वाट सुरळीत होणार कधी असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऐनवेळी आढावा बैठक रद्द केल्यामुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची पूर्व तयारी साठी झालेली धावपळ अक्षरशः मातीत गेली आहे. जनतेचे प्रश्न जैसे थे च आहेत.
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे विविध मुद्द्यावर चर्चा व आढावा मंगळवारच्या आढावा बैठकीतून घेणार होते. यामध्ये प्रामुख्याने कोरोना लसीकरणाची सद्यस्थिती काय आहे यापुढे नियोजन कसे करायचे, सध्या शेतकरी पेरणीचे दिवस तोंडावर असल्यामुळे पीक कर्जासाठी बँकांकडे चकरा मारत आहे. जवळपास सर्वच बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी हात आखडता घेतला आहे. पिक विम्या संदर्भात देखील या आढावा बैठकीत नियोजन ठरवण्यात येणार होते. मात्र सद्यस्थितीत जिल्हा पुढे अनेक प्रश्न उभे राहिलेले असताना नेहमीच्या सवयी प्रमाणे स्वतः पालक मंत्री धनंजय मुंडे यांनीच आढावा बैठक ऐनवेळी रद्द केली. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असो की शेतकऱ्यांचा प्रश्न असो यांची थोड्याफार प्रमाणात चर्चा झाली, प्रश्नांची उकल होईल असे मनाचे मांडे मांडले गेले मात्र आढावा बैठक म्हणजे ” बोलाचा भात बोलाचीच कढी “बनली गेली.
एकंदरीतच आतापर्यंत पालकमंत्र्यांनी चार वेळा आढावा बैठक ऐनवेळी रद्द केलेली आहे. त्यांच्या या सवयीमुळे प्रशासन मात्र पुरते वैतागले आहे. एका आढावा बैठकीसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे चार दिवस माहिती एकत्रित गोळा करण्यात जातात मात्र ऐन वेळी आढावा बैठकच रद्द होते त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आढावा बैठक म्हणजे, लांडगा आला रे आला… अशी गत झाली असल्याची चर्चा होत आहे….

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close