क्राईम

मराठा आरक्षण मोर्चा: आ. विनायक मेटें सह मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल

बीड – कोरोना संकटाच्या काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केलेला असताना या कायद्याचे उल्लंघन करत आ. विनायक मेटे यांनी शनिवारी मराठा आरक्षण मोर्चा काढला होता. यावेळी जमावबंदी आणि संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार मेटे सह 21 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात वातावरण तापले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड मधून आमदार विनायक मेटे यांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकले. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण मागणीसाठी त्यांनी मोर्चा देखील काढला त्यांना पाठिंबा देण्यासाठी माजी आ. नरेंद्र पाटील हेदेखील बीड येथे आले होते. परंतु सध्या कोरोना संकट काळ असल्यामुळे निर्बंध कडक करत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी जमवून, राजकीय किंवा सामाजिक आंदोलन, मोर्चा काढण्यास परवानगी नाही. मराठा आरक्षणच्या मागणीसाठीच्या मोर्चाला देखील पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती.
मोर्चाला कोणतीही परवानगी नसताना आ मेटे आणि इतरांनी परवानगी झुगारून मोर्चा काढत कायद्याचे उल्लंघन केले .या प्रकरणी मंडळ अधिकारी अतुल झेंड यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिसात आ मेटे,नरेंद्र पाटील,राजेंद्र घाग,रमेश पोकळे,स्वप्निल गलधर, अनिल घुमरे युवराज मस्के,मनोज जरांगे यांच्यासह 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close