आपला जिल्हा

नगराध्यक्षांच्या हस्ते नगर पालिकेच्या आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप

बीड — कोरोनाच्या या महामारीत या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी बीड नगर पालिकेच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.काल नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप करण्यात आले.

बीड जिल्ह्यात नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किट वाटप करणारी बीड नगर पालिका एकमेव नगर पालिका आहे.बीड नगर पालिकेच्या माध्यमातून लॉक डाऊन च्या काळात नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना, हातावर पोट असणाऱ्या आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक जे कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे खरेदी करू शकत नाहीत अशा नागरिकांना आजची परिस्थिती लक्षात घेता डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने नॉन डिसपोझेबल किट, मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड मास्क, पी.पी. ई. किट,
ग्लोज देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षांनी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी तोंडाला मास्क लावणे, सतत हात धुणे व सोशल डिस्टन्स पाहण्याची विनंती केली व या कोरोना काळात साहित्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
याकोरोनाच्या संकटकाळी नगर पालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील नागरिकांसाठी काम करत
असल्याने नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी आभार मानले.
याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, अधिकारी, पुरुष कर्मचारी, महिला कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य दिल्यामुळे नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांचे आभार मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close