आरोग्य व शिक्षण

कोरोना च्या दुसऱ्या लाटेला बीड जिल्ह्यात ओहोटी

बीड — जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असून रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाली आहे. गुरुवारच्या अहवालामध्ये फक्त 322 रुग्ण आढळले आहेत. बीड तालुक्याची रुग्ण संख्या सर्वाधिक असल्याचं आजच्या अहवालात देखील पाहायला मिळालं.
गेल्या आठ दहा दिवसा पासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. गुरुवारी 3310 जणांच्या तपासणी अहवालात 322 रुग्ण आढळून आले. अंबाजोगाई तालुक्यामध्ये 16 आष्टी मध्ये 60 बीडमध्ये 74 तर धारूर मध्ये 28 रुग्ण सापडले आहेत. गेवराई मध्ये 33 केज मध्ये 25 माजलगाव मध्ये 22 परळी मध्ये फक्त चार रुग्ण आढळले आहेत पाटोदा तालुक्यामध्ये सतरा शिरूर मध्ये 28 वडवणी मध्ये 15 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी निर्बंध अद्याप कायम आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close