क्राईम

सराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबी कडून जेरबंद

बीड — शिरूर कासार येथील सराफा व्यापाऱ्याचा खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीच्या अखेर एलसीबीने मुसक्या आवळल्या. काल रात्री त्याला नाशिक रोडवर पोलीसांनी बेड्या ठोकत शिरूर पोलीसांच्या स्वाधीन केले. खून करून तो आपल्या पत्नीसह फरार झाला होता. पोलीसांना संशय येवू नये म्हणून तो दर दोन-तीन दिवसाला शहर आणि रूम बदलत असे मात्र अखेर पोलीसांनी त्यास जेरबंद करण्यात यश मिळवले.
शिरूर कासार येथील सराफ विशाल सुभाष कुलथे याचा 23, हे रोजी खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर पोलीसांनी २ आरोपींना अटक केले होते. मात्र यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड हा त्याच्या पत्नीला घेवून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी शिरूर पोलीसांसह एलसीबीचे पथक रवाना झाले होते. सुरूवातीला तो औरंगाबाद येथे राहिला होता. त्यानंतर नांदेड, नाशिक सातपुर असे लोकेशन पोलीसांना मिळाले होते. तो ज्या शहरात भाड्याने रूम करून राहत होता. मात्र पोलीसांना संशय येवू नये म्हणून दोन-तीन दिवसाला रूम चेंज करायचा आणि घर मालकाला महिन्याचं भाड देवून टाकायचा. काल नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात तो वास्तव्यास आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय भारत राऊत यांना झाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमसह काल नाशिक शहर गाठुन नाशिक रोड पोलीसांच्या मदतीने आरोपी ज्ञानेश्‍वर गायकवाड याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधिक्षक राजा रामा स्वामी, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, डिवायएसपी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय भारत राऊत, बालाजी दराडे, काळे, वाघमारे, हंगे, महिला पोलीस संगिता सिरसाट, जायभाय यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close