क्राईम

कायद्याची वाट लागली: वाळू माफियांचे पाय चाटणारी ‘राजा’ची पोलीस शेतकऱ्यांना मारहाण करू लागली

आमदार लक्ष्मण पवार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

बीड — वाळू माफिया अवैध धंद्यावाल्या विरोधात शेपूट घालणाऱ्या गेवराई पोलिसांनी बी बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यास बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार लक्ष्मण पवार यांनी केला आहे. सोमवारी सकाळी कोल्हेर रोडवर ही घटना घडली असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे लक्ष्मण पवार यांनी सांगितले आहे
गेवराई तालुक्यामध्ये वाळूमाफियांनी उच्छाद मांडलेला असताना ‘राजा ‘ ची पोलीस वाळू माफिया पुढे शरणागत आहे. तर दुसरीकडे आहे सर्वसामान्य जनतेवर रझाकारा प्रमाणे अन्याय करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या बीड महामारी मुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. असं असलं तरी शेतकरी वर्ग खरीप पेरणी च्या तयारीला लागला आहे प्रशासनाने देखील शेतकऱ्यांना खते बी-बियाणे खरेदीसाठी सूट दिली आहे. अशावेळी शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा प्रकार घडताना दिसून येत आहे. सोमवार दिनांक 31 मे रोजी किनगाव येथील शेतकरी मोतीराम चाळक वय 40 वर्ष हे बियाणे खरेदीसाठी गेवराई शहरात आले असता पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माफियांचे पाय चाटणाऱ्या व शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या पोलिसांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगितला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close