देश विदेश

डाक विभाग लोकनेते गोपीनाथ मुंडेंची प्रतिमा असलेल्या तिकिटाचे प्रकाशन करणार

बीड — दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भारतीय डाक विभाग त्यांची प्रतिमा असलेल्या तिकीटाचे प्रकाशन करणार आहे. भारतीय डाक विभागाचे मुख्यालय असलेल्या दिल्लीतून हे प्रकाशन करण्यात येणार आहे. भारतीय डाक विभागाकडून तिकीटाचे प्रकाशन हा मोठा गौरव असून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

देशपातळीवर मोठे कार्य आणि कर्तृत्व असलेल्या महान व्यक्तींची प्रतिमा असलेल्या तिकीटाचे प्रकाशन करून भारतीय डाक विभाग त्यांच्या कार्याचा गौरव करत असतो. यापूर्वी भारतीय डाक विभागाने थोर संत भगवानबाबा, यशवंतराव चव्हाण, सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर अशा महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींची प्रतिमा असलेले तिकीट प्रकाशित करून त्यांचा गौरव केलेला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close