क्राईम

अल्पवयीन बालिकेचा बालविवाह थांबविण्यात महिला व बालविकास विभागास यश

बीड — बुधवार दि 26 मे रोजी बीड चे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री व्ही एम हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे होणा-या बालविवाह बाबतची कार्यवाही करण्यात आली. मंगळवार दिनांक 25 मे रोजी प्राप्त गुप्त माहिती नुसार संशयित ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता बालिका हि अल्पवयीन असल्याचे दिसून आले, पण सदर ठिकाणी विवाह होत असल्याबाबत काही एक दिसून येत नव्हते तरी हि मुलींच्या आई वडील यांच्या कडून बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार जबाब नोंदवून घेतले.

बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार नाही या बाबत सूचना देण्यात आल्या, तसेच बर्दापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एल.शिंदे यांनी पालकांकडून जबाब नामा लिहून घेऊन पालकांना समज दिली. तसेच जर मुलीचा विवाह 18 वर्षे पूर्ण होण्या आधीच केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.
तसेच अल्पवयीन बालिकेला बालकल्याण समिती समोर उपस्थित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, यावेळी श्रीमती विद्याताई माले अध्यक्ष ग्राम बाल संरक्षण समिती , तथा सरपंच साळुंकवाडी , श्रीमती संजिवनीताई बेलदार उपसरपंच साळुंकवाडी , जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बीड श्री व्ही. एम. हुंडेकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका ए.डी. क्षिरसागर , बर्दापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आर.एल.शिंदे , पोलीस कॉन्स्टेबल पी आर जाधव, पोलीस कान्स्टेबल एस डी चेवले, पोलीस पाटील इंद्रशेखर कर्वे , बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बी एच मेंगले , बाल संरक्षण समितीचे पदाधिकारी बालासाहेब जगदाळे , जालिंदर कसाब, सुनंदा यादव आशा स्वयंसेविका , महानंदा लिंगा अंगणवाडी सेविका , जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाजीराव ढाकणे , अंबाजोगाई चे तालुका संरक्षण अधिकारी श्री संतोष वैष्णव तसेच इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर बालविवाह प्रकरणात अंगणवाडी पर्यवेक्षिका ए. डी. क्षिरसागर यांनी आई वडील यांना मार्गदर्शन केले व समज देण्यात आली.सदर अधिकारी व कर्मचारी संशयित बालविवाह थांबवण्यात यशस्वी झाले
बीड जिल्ह्यातील ग्राम बाल संरक्षण समिती व वार्ड बाल संरक्षण समितीच्या पदाधिकारी मंडळींने आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत यासाठी सतर्क राहावे आपल्या परिसरातील कोणत्याही मुलींचे 18 वर्षे व मुलाचे 21 वर्षे वय पुर्ण झाल्याशिवाय विवाह होणार नाही. यांची गावाचे सरपंच , ग्रामविकास अधिकारी, तलाठी व अंगणवाडी सेविका यांनी खात्री करावी तसेच आपल्या भागातील लोकांना जागृत करावे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close