आपला जिल्हा

दंडाच्या नावाखाली सामान्यांची लुट, वाळु माफियांना सुट; पोलीस अधीक्षकांची जबाबदारी निश्चित करा — डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड — जिल्ह्य़ातील पोलीस प्रशासनाकडून लाॅकडाऊन कालावधीत चेकपोस्टच्या नावाखाली दुचाकी, चारचाकी वाहनांकडून सक्तिची वसुली तसेच शिविगाळ करत मारहाण करत असल्याच्या घटनात वाढ झाली असून त्याचवेळी जिल्हाधिका-यांना बंदी घातलेल्या वाळुच्या हायवा गाड्या मात्र पोलीस प्रशासनातील आधिका-यांच्या मर्जीने वाळु माफियांसोबत आर्थिक तडजोड करत फिरताना दिसून येतात त्यामुळेच शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडण्याबरोबरच पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून याप्रकरणात जबाबदार वरीष्ठ आधिकारी पोलीस अधिक्षक बीड यांच्यावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, पोलीस महासंचालक, यांना केली आहे.
बीड जिल्ह्य़ातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्य़ात चेक पोस्टवर तपासणी करून सोडण्यात येते, विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते, ही बाब जरी स्वागतार्ह असली तरी अत्यावश्यक सेवेतील लोक, वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडलेल्या लोकांचीही अडवणुक केली जात असून दंडाचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी सामान्यांची आर्थिक लुट केली जात आहे याचवेळी वाळुमाफियांना मात्र सुट दिली जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे, यावेळी सर्वसामान्यांना अरेरावी आणि दादागिरीची भाषा करत शिविगाळ तर कधी अमानुष मारहाण केल्याच्या घटना घडत आहेत.

पोलीस अधिक्षकांची भुमिका संशयास्पद

5 मे रोजी शासकीय सेवेतील डाॅ.विशाल वनवे, वैद्यकीय आधिकारी टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्र ता. आष्टी यांना संतोष वाळके उपविभागीय पोलीस आधिका-याने ओळखपत्र दाखवून सुद्धा अमानुष मारहाण केली होती याबद्दल विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी तक्रार केल्यानंतर सुद्धा पोलीस अधिक्षक यांनी ठोस कारवाई केली नसून कोट्यावधी रूपयांचा शासनाचा महसुल वाळु तस्करी प्रकरणात बुडत असताना व जिल्हाधिका-यांनी हायवा द्वारे वाळु वाहतुकीस बंदी असताना खुलेआम वाळुचे टीप्पर विनाक्रमांक जाताना दिसून येतात यात वाळु तस्कर, महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांची मिलिभगत असून आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचे बोलले जाते, या सर्व प्रकरणात पोलीस अधीक्षक बीड यांच्यावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close