क्राईम

शिरुरकासार येथील सोनाराचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून 

शिरुरकासार — शिरुरकासार येथील एका सोनराचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला मृत्यूदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आला या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शिरुरकासारचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने अधिक माहिती देताना म्हणाले की शिरुरकासार येथील सोनार विशाल सुभाष कुलथे (वय २५) या इसमाचा गुन्हा रजि ६३/२०२१ कलम ३६५ भादवि ३४ नुसार गुन्हा दाखल आहे सदर घटना गुरुवारी दि २० रोजी घडली गुप्त खबऱ्यामाफऺत महिती मिळाल्यानंतर चौकशी केली असता शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर गायकवाड यांचे शिरुरकासार येथे सलूनचे दुकान असून याच दुकानात सोनराचा खून करण्यात आला आहे अधिक माहिती घेऊन त्याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीचे उत्तरे दिली मात्र त्याला पोलिस खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला व गुन्ह्याची कबुली देत ज्याठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला ते ठिकाण दाखविण्यात आले शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील गट न‌४२९/१/१ मधील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात मृत्यूदेह लांबी चार बाय रुंदी तीन व खोली फुटाचा खडृडा खोदून पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांचा शिरुरकासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदीचा बहाना करून सोनार विशाल सुभाष कुलथे यांच्याकडे संपर्क केला माझे लॉकडाऊन मध्ये लग्न झाले त्यामुळे जास्त सोनं करायचे आहे असे सांगून ऑडऺर देण्यात आली दुकानातील तयार असलेले सोने घेऊन माझ्या दुकानात ये असे गायकवाड म्हणाला सोनारानी सोने घेऊन सलून दुकानात गेला व त्याच ठिकाणी त्याचा घात झाला शेवगाव पोलिस शिरुरकासार पोलिस महसूल शेवगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला प्रेत पोस्टमार्टमसाठी मृत्यूदेह पाठविण्यात आला केतन लोमटे शिवाजी गायकवाड यांना अटक करण्यात आली असून ज्ञानेश्वर गायकवाड फरार असल्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी सांगितले पुढील तपास चालू आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close