आपला जिल्हा

जनतेला आता खऱ्या आधाराची गरज आहे तो देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड — आजचे संकट हे फार मोठे संकट आहे अशा संकटकाळात जनतेला आधार देण्याची गरज आहे आणि तो देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहायला आहे या काळात अधिकाधिक मदत व्हावी यासाठी स्थानिक ते मंत्रालय पातळीवरील अधिकाऱ्यांना सातत्याने संपर्क करून प्रश्नांची सोडवणूक करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आपण करत आहोत विरोधक टीकाकार यांच्याकडे लक्ष न देता माणूस केंद्रबिंदू मानून आपण काम करत आहोत असे सांगून माझे कुटुंब,माझी जबाबदारी आणि माझ्यावर समाजाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

बीड नगर परिषदेच्या माध्यमातून या कोवीड – 19 च्या कालावधीत आरोग्य कर्मचारी,न.प.कर्मचारी यांच्यासाठी पी.पी.ई.कीट,थर्मलगण,आँक्सिमीटर,नॉन डीसपोझेबल कीटचे वाटप करण्यात येत आहे.आज बीड जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना या सर्व साहित्याचे वाटप मा.मंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की आज जवळपास चौदा महिन्यापासून कोरोना महामारी च्या प्रादुर्भावामुळे सगळेच नागरिक अडचणीत आले आहेत मुख्यता सर्वसामान्य माणूस जीव मुठीत घेऊन जगण्याचा प्रयत्न करत आहे राज्य शासन अनेक पातळीवर यासाठी उपाय योजना करत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांच्या सहकार्याने कोरोना काळात जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे अशा काळात आम्ही स्थानिक नागरिकांना गरजूंना मदत व्हावी यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहोत गेल्यावर्षी सुरूवातीलाच आपण पंधरा हजार कुटुंबांना घरगुती किराणा सामानाचे वाटप केले आहे त्याच बरोबर आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथीचे रोगप्रतिकारक औषध प्रत्येक घराघरात वाटप केले आहे, स्थानिक पातळीवर अनेक गरजूंना धान्यांचे वाटपही केले आहे कोरोना काळात ऊस तोडी ला गेलेले ऊस तोड मजूर घराकडे परतले होते तेव्हा त्यांना विलगीकरण मध्ये ठेवण्याचा निर्णय झाला होता राजुरी रोडवर सैनिकी विद्यालयांमध्ये या ऊसतोड कामगारांची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी देखील दोनशे बेडचे कोवीड सेंटर चालू आहे नगरपालिकेच्या वतीने शहरातील कोविड सेंटर मधील रुग्णांची व्यवस्था व्हावी यासाठी बेड गाद्या पिण्याचे पाणी यासारखे साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत ठिक ठिकाणी फवारणीची कामे स्वच्छतेची कामे आजही सुरू आहे कोरोनामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला पालिकेच्या वतीने हे सर्व अंतिम विधी केले जातात , विद्युत शवदाहिनी असावी यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू केला होता राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते त्याच वेळी आपण ही आग्रहाची मागणी त्यांच्याकडे केली आणि काही तासातच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी तात्काळ वर्ग करण्यात आला यातूनच आरोग्य कर्मचारी नगर परिषद कर्मचारी तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप केले जात आहे तसेच विद्युतदाहिनी आणि ऑक्सिजन उत्पादनाचे काम लवकरात लवकर कसे करता येईल यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत उत्पन्नाची बाजू आणि लोकसंख्येच्या मानाने अपुरा पडणारा कर्मचारीवर्ग असला तरी नगरपालिकेचे कामे खाजगी तत्वावर देऊन ते केली जात आहेत, गेल्या वर्षभरात बीड शहरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत विविध योजनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून आपण यासाठी निधी उपलब्ध केला आहे संकट असलेतरी विकासाची कामे महत्त्वाची होती लॉक डाउन काळात अनेक प्रश्न निर्माण झाले व्यापारी शेतकरी दूध उत्पादक दुकानदार छोटे छोटे व्यावसायिक यांना या काळात मदत व्हावी यासाठी स्थानिक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तसेच मंत्रालय पातळीवरील अधिकाऱ्यांना सातत्याने भेटून प्रश्नांची सोडवणूक करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आपण करत आहोत विरोधक टीकाकार यांच्याकडे लक्ष न देता माणूस केंद्रबिंदू समजून आपण आपले काम केले तरच जनतेला त्याचा आधार वाटत असतो केवळ पत्रकबाजी किंवा फोटोसेशन करून कुठली कामे होत नसतात आता जनतेला खऱ्या आधाराची गरज आहे तो देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असून नागरिकांनी या काळात आपली काळजी घ्यावी लक्षणे दिसल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे जेणेकरून वेळेत उपचार घेता येतील माझी जबाबदारी समाजाची जबाबदारी समजून आपण काम करत असून कोरोना योध्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असे ते म्हणाले

यावेळी नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर म्हणाले की, बीड शहरात सेंटर मधील रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे हे करत असतानाच या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना तोरणा प्रतिबंधक साहित्याची नितांत गरज होती ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या माध्यमातून आज या साहित्याचे वाटप करत आहोत कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या प्रत्येकाचे संरक्षण करणे आणि त्याला सुरक्षित ठेवणे या एकमेव उद्देशानेच या साहित्याचे वाटप आपण करत आहोत नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत

प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख कुंडलीक(बाप्पु) खांडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गिते,डॉ.हुबेकर,मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे,अरुण डाके,डॉ.योगेश (भैय्या) क्षीरसागर,शहरप्रमुख सुनिल सुरवसे,मोईन मास्टर,नगरसेवक मुखीद लाला,शुभम धुत,शैलेश नाईकवाडे,आशिष काळे,विठ्ठल गुजर यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर,नर्स,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.याठिकाणी 400 कीट देण्यात आल्या.यामुळे निश्चितच या कोरोना काळात मोठी मदत जिल्हा रुग्णालयास झाली असुन,त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा वाटा पालिकेने उचलला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close