आरोग्य व शिक्षण

ओहोटी लागली ! विक्रमी 9000 चाचण्या, रुग्ण सापडले 962

बीड — कोरोनाच्या काळात आतापर्यंत कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या घेण्यात आल्या नव्हत्या.चाचण्याची संख्या दूप्पट म्हणजेच 8929 होऊन देखील रूग्ण संख्येला हजाराचा आकडा गाठता आला नाही. जिल्ह्यात फक्त 962 रुग्ण आढळले आहेत. एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे रविवारी सर्वाधिक चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला असला तरी रुग्ण संख्या मात्र त्यामानाने खूप कमी आहे. अंबाजोगाई तालुक्यात 64 आष्टी तालुक्यामध्ये 83, बीड तालुक्यामध्ये सर्वाधिक 268 रुग्ण संख्या आढळली आहे. धारूर मध्ये 81, गेवराई मध्ये 88 केजमध्ये 89, माजलगाव 47 परळी मध्ये फक्त 26, आठवड्यामध्ये अष्टयाहत्तर, शिरूरमध्ये 109 वडवणी मध्ये 29 रुग्ण सापडले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close