आरोग्य व शिक्षण

कामात कुचराई; डॉक्टरसह सात जण कार्यमुक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कारवाई

आष्टी — येथील कोवीड सेंटरमधील रूग्णांच्या सेवेत हलगर्जीपणा करणार्‍या एका डॉक्टरसह ७ जणांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर बी पवार यांनी कार्यमुक्त केले. शनिवारी पहाटे त्यांनी अचानक या ठिकाणी भेट देत ही कारवाई केली.

आष्टीतील कोवीड सेंटमध्ये उपचार घेत असलेले रूग्ण बाहेर फिरताना डॉ.पवार यांना भेटी दरम्यान आढळून आले , डॉक्टर, परिचारिका उपचाराकडे दुर्लक्ष करतात, वॉर्डबॉय स्वच्छता करत नाहीत, अशा तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी याची गंभीर दखल घेत आष्टी गाठत कोवीड सेंटरची तपासणी केली. यात त्यांना अनेक त्रूटी दिसल्या. तसेच कामात हलगर्जी झाल्याचेही दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता येथे कर्तव्यावर असणार्‍या डॉ.माधूरी पाचरणे, या डॉक्टरसह अश्विनी पानतावणे, रूपाली काळे आणि वार्डबॉय निखिल वाघुले,आकाश राऊत,सुमित धोंडे,आणि भारत राऊत यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close