आपला जिल्हा

सह्याद्री माझा इफेक्ट: कोरोना रुग्ण आत्महत्या प्रकरणी दीप हॉस्पिटल व गीते संबंधाची चौकशी करणार — डॉ माले

बीड — बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख असताना ते दीप हॉस्पिटल नावाचे खासगी रुग्णालय चालवतात. त्यांच्या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णाने बिलाचा तगादा लावल्यामुळे शुक्रवारी पहाटे आत्महत्या केली होती. या प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील शल्य चिकित्सका मार्फत चौकशी करण्यात येईल असा शब्द आरोग्य उपसंचालक डॉक्टर माले यांनी दिला आहे.
बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीतेची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. जिल्हा रुग्णालया सोबतच दीप हॉस्पिटलचा कारभार देखील हाकत असल्याची बाब “सह्याद्री माझा” ने उघडकीस आणली. शुक्रवारी त्यांच्या दीप हॉस्पिटलने बिलासाठी तगादा लावल्यामुळे नैराश्येपोटी कोरोना रुग्णाने आत्महत्या केली. आपल्या खाजगी हॉस्पिटलचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी पदाचा दुरुपयोग देखील केला. दीप हॉस्पिटल मध्ये आलेल्या रुग्णांची लूट होत असल्याच आज पर्यंत बोललं जात होतं. मात्र ही बाब कालच्या आत्महत्या प्रकरणाने उघडकीस आणली
याबाबत मी विभागातील दुसऱ्या जिल्ह्यातील शल्यचिकित्सका मार्फत चौकशी समिती नियुक्त करून गित्ते यांची चौकशी करण्यात येईल.तसेच गित्ते यांच्यावर कारवाई करण्यासाठी माझा स्वत:चाही स्वयं स्पष्ट अहवाल राज्य शासनाला पाठवून देईल. असा शब्द आरोग्य उपसंचालक डॉ. माले यांनी दिला.गेल्या दोन दिवसांपासून लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक माले हे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डाचा राऊंड डॉ माले नी घेतला. या राऊंडमध्ये त्यांना कायमस्वरुपी डॉक्टर दिसून आला नाही. या वार्डामध्ये कंत्राटी डॉक्टर सेवा देतात. कायमस्वरुपी डॉक्टर स्वत:च्या दवाखान्यामध्ये मश्गुल असतात. या दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. डेथ ऑडीट झालेले नाही, कोविड रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ज्या समित्या नियुक्त केल्या त्यातील कोणती समिती काम करत नाही, बाहेरून औषधे आणण्याची गरज नसताना येथील डॉक्टर रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणण्यास सांगतात. त्यामुळे गेल्या दोन दिवसात मी दवाखान्याची सगळी परिस्थिती लक्षात घेतली असून त्यामुळे दोषींना कारणे दाखवा नोटीसा बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोविड रुग्णांसाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन त्यांचे समोपदेशन आणि मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे माले यांनी सांगितले. याबाबत माले यांनी सरकारी दवाखान्याच्या कामकाजाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close