क्राईम

आईला मारहाण झाल्याने राग अनावर, जन्मदात्या बापावर मुलाने झाडल्या गोळ्या

आष्टी — आईला मारहाण झाल्याचा राग अनावर होऊन मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलावर बंदुकीतून गोळ्या झाल्याची घटना विनायक नगर भागामध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेची गंभीर रीत्या जखमी झालेल्या पित्यास उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.

संतोष किसन लटपटे वय पन्नास वर्ष हे तीन महिन्यापूर्वीच सैन्यदलातून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. गुरुवारी दारू पिऊन घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीस मारहाण करण्यास सुरुवात केली. घरात नेहमीच वाद होत असल्यामुळे संतोष लटपटे यांचा मुलगा किरण लटपटे वय 24 वर्ष याने राग अनावर होऊन चक्क जन्मदात्या बापावर तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यातील दोन गोळ्या त्यांच्या पोटावर लागल्या यात ते गंभीररीत्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान संतोष लटपटे यांना उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपी किरण लटपटे यास अटक केली. किरण लटपटे यांने आईला मारहाण होत असल्याचे पाहून मला राग अनावर झाल्यामुळे मी बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे प्राथमिक जबाबात पोलिसांना सांगितले. पोलीस आरोपींचा कसून चौकशी करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close